पोस्ट्स

मातृत्व, कृतत्वं, माणुसकी व उदार अंतःकरणाचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आमची आत्या सौ. विजयालक्ष्मी आनंदराव भेदेकर' यांना द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन -किरण त्र्यंबक चावरे

तथागत बुद्धाच्या पवित्र बोधीवृक्षाप्रमाणे केवळ आपल्या 'भेदेकर' परिवारासच नव्हे तर 'चावरे परिवार', 'वाघमारे परिवार', 'शिराढोणकर परिवार', 'ढवळे परिवाराला' व तसेच प्रत्येकच नात्याला व नात्यातील प्रत्येक व्यक्तीला प्रेम, आपुलकी व माणुसकीची सावली देणारी व्यक्ती म्हणजे 'आमची आत्या' व सर्वांची आक्का आणि आई असणारी आमची सौ. विजयालक्ष्मी आनंदराव भेदेकर' जी सर्वार्थाने आम्हा सर्वांची 'आईच' होती. कारण नात्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी आईचीच भुमिका बजावली होती. सखं- चुलत असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. कारण नाते हे चुलत असले तरी ते शेवटी रक्ताचेच असतात. असं आमच्या आत्याला मनोमन वाटायचं.  म्हणून ती घरी आलेल्या प्रत्येक माणसाची आपरूक करायची. खरंतर सखं-चुलत असा भेद कोणीही करू नये. चुलत नातं असण्यात काहीच गैर नाही. आपल्याच सख्या नात्यातील एखाद्या व्यक्तीच्या परिवारात वाढ व विस्तार होत जातो तेव्हा ते पुढे चुलत नाते बनत जातात. पण त्यांचं रक्त हे एकच असतं. जसे एखाद्या झाडाच्या अनेक फांद्या असतात परंतु त्याचं मूळ ...
अलीकडील पोस्ट